परभणी : राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाथरी विधानसभा मतदार संघासाठी माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
तसेच मराठवाडयातील ६ मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी देवून न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्याकडे पेडगावचे उपसरपंच शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे.
यावेळी खा. शरदचंद्र पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत मराठवाड्यासह महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याची पक्षाची भुमिका असल्याचे सांगितले. दि.१९ सप्टेंबर रोजी मुंबई येथिल यशवंतराव चव्हान सभागृहात झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात शेख सलमान, शेख मुस्तफा, सय्यद मेहराज, अयुब खान, शेख नयुम, अॅड. मोहम्मद लुकमान, शेख इसाक, शेख रहीम, शेख इस्माईल, शेख रहीम, शेख अजीम यांच्यासह मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.