23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणीनांदेड-पनवेल विशेष गाडीच्या २४ फे-या मंजूर

नांदेड-पनवेल विशेष गाडीच्या २४ फे-या मंजूर

परभणी : दसरा आणि दिवाळी सणा निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने परभणी, जालना, औरंगाबाद, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष गाडीच्या २४ फे-या मंजूर केल्या असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे.

गाडी क्रमांक ०७६२५ हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी २१ ऑक्टोंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटेल. पूर्णा, परभणी, मानवतरोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुस-या दिवशी दुपारी १.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात मिळून १२ फे-या पूर्ण करेल.

तसेच गाडी क्रमांक ०७६२६ पनवेल ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दि.२२ ऑक्टोंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि वरील मार्गानेच नांदेड येथे दुस-या दिवशी सकाळी ४.३० वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात मिळून १२ फे-या पूर्ण करेल. या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून २२ डब्बे असतील अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR