23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींना धमक्या देणा-या तालिबानीवृत्ती विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

राहुल गांधींना धमक्या देणा-या तालिबानीवृत्ती विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात मीरा भाईंदर येथे आंदोलनात सहभागी

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देणा-या सताधारी नेत्यांविरोधात काँग्रेसने आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणा-यांना भाजपा-शिवसेनेने आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

मीरा भाईंदर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज बंटी पाटील, हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप यांच्यासह नेते, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भाजपाच्या तालिबानीवृत्तीचा निषेध केला. मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथीस घरासमोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती गेटवर शिवसेना आमदार संजय गायकवाड, भाजप नेते अनिल बोंडे, तरविंदर सिंग मारवाच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी बाजार समिती सभापती संजय जाधव, शहर अध्यक्ष नंदकुमार कोतवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील आकाशवाणी चौकात शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना (वइळ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (रढ) नेतेही आंदोलनाला उपस्थित होते. या वेळी भाजपाच्या तरविंदर मारवा, रवनीत बिट्टू, अनिल बोंडे व शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, जळगावच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, जगन्नाथ काळे, योगेश मसलगे, इब्राहिम पठाण, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. नागपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करून वाचाळवीरांचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली.

नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनेही आंदोलन करून वाचाळवीरांचा निषेध केला. कोल्हापूर काँग्रेस कमिटीनेही आंदोलन करून धमक्या देणा-यांचा धिक्कार केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR