26.2 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeलातूरबामणी, भडी येथे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण

बामणी, भडी येथे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर तालुक्यातील भडी व बामणी येथे आमदार निधीतून झालेल्या सिमेंट रस्ता व नाली कामाचे (७ लाख रुपये) लोकार्पण लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. बामणी व भडी (ता. लातूर) येथे मंगळवारी (दि. १७) विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. बामणी येथे ५६.४५ लाख तर भडी येथे ४७.८३ लाख रुपयांची विविध विकासकामे चालू पंचवार्षिक वर्षात केली असल्याचे सांगून गावात आणखी विकासकामे आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. बामणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी अभिवादन केले.
श्री जय जगदंबा गणेश मंडळाच्या श्री गणेशाची व श्री जय जगदंबा मातेच्या मंदिरात आई जगदंबेची आरती केली. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष हरिंश्चंद्र चव्हाण, माजी सरपंच वैजनाथ दिवटे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी बंडापल्ले, माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले, युवक काँग्रेसचे सचिव अनंत ठाकूर तसेच भडी येथील कार्यकर्ते नामदेव अवस्कर, जब्बार सय्यद व सतीश पाटील यांच्या निवासस्थानी आमदार देशमुख यांनी भेट दिली.
या वेळी संतोष देशमुख, पृथ्वीराज शिरसाठ, वाल्मीक माडे, राजकुमार पाटील, प्रवीण पाटील, सुभाष घोडके, शंकर बोळंगे, पुनीत पाटील, बालाजी वाघमारे, रघुनाथ शिंदे, बळवंतराव पाटील, संभाजी रेड्डी, अनिल जाधव, लक्ष्मण ठाकूर, आत्माराम माडे, नारायण पाटील, परमेश्वर पाटील, पांडुरंग वीर, विपिन गवरे, कमलाकर बाचपल्ले, धनंजय बाचपल्ले, सूर्यकांत वीर, अरुण वीर, गोंिवद अवस्कर, विनोद वीर, निमा वीर, अनंत ठाकूर, उत्तम वीर, ज्ञानोबा वीर, दत्ता वीर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR