29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा हेच शिंदेंचे धोरण

मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा हेच शिंदेंचे धोरण

लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल प्रत्येक पक्ष मंत्रीमंडळात गेल्याने गोंधळ

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला आहे की, सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे. प्रत्येक पक्ष मंत्रिमंडळात गेला आहे. मात्र, ओबीसी आणि दलित बांधव जिथल्या तिथेच आहेत. मराठा तितुका मेळवावा नाही, मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा असे मुख्यमंत्र्यांचे आणि प्रत्येक पक्षाचे धोरण असल्याची टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की, आमच्या प्रमुख मागण्या, आमची मागची कोणतीही मागणी सरकारने पूर्ण केलेली नाही. आता गॅझेटचे नवीनच फॅड सुरू झाले आहे. गॅझेटमुळे जीआर काढण्याचा अधिकार मंर्त्यांना आहे का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून हवे आहे. स्टेट बॅकवर्ड कमिशन शिफारस घेतल्याशिवाय गॅझेट लागू करता येणार नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो लोकसभेच्या निवडणुका या प्रश्नावरून पार पडल्यात आणि येणा-या विधानसभा निवडणुकीमध्ये यांना हेच करायचे आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

…तर ओबीसींनी मतदान का करायचे?
आमचे आरक्षण वाचवण्याचे उपोषण आहे. कुणाला शिव्या देण्याचे नाही. आता निवडणुका पक्ष पार्ट्यांवर होणार नाहीत. या निवडणुका ओबीसी वर्सेस मराठा होतील. सामाजिक न्यायासाठी जी माणसे उभी राहतील त्या त्या माणसाला ओबीसी बांधव समर्थन देतील. जरांगेंच्या व्यासपीठावर गेलेल्या लोकांना ओबीसींनी मतदान का करायचे? मग उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, तानाजी सावंत असो, पृथ्वीराज चव्हाण असो की अशोक चव्हाण असो, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी यावेळी केला.

जरांगे कोणाचे समर्थक आहेत?
एकनाथराव कान उघडे ठेवून ऐका. रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. आम्हाला कोणाचे तरी समर्थक म्हटले गेले, छगन भुजबळ यांचे समर्थक म्हटले. आता रोहित पवार म्हणत आहेता की, लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीस यांची भाषा बोलत आहेत. आम्ही सगळ्यांचे समर्थक आहोत हे काय आतंकवादी आहेत का? हे पण महाराष्ट्राचेच आहेत, आम्ही समर्थक आहोत. पण, जरांगे कोणाचे समर्थक आहेत? हे त्यांनी सांगावे असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR