29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रभास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी

भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी

नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते अशोक चव्हाण यांचे नातेवाईक आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी त्यांच्या समर्थकांसह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि मीनल पाटील खतगावकर यांनीही पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, नांदेड जिल्ह्यामधील नायगाव विधानसभा मतदारसंघातून मीनल पाटीलल खतगावकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे नातेवाईक आणि माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपाचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर, त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपाचे कमळ हाती घेतले होते. तरीही नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR