25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमतदारांच्या अपेक्षा काँग्रेस पक्षच पूर्ण करु शकतो 

मतदारांच्या अपेक्षा काँग्रेस पक्षच पूर्ण करु शकतो 

लातूर : प्रतिनिधी
सर्व समान्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणने, हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. त्या विचाराचे पाईक म्हणून आमदार धिरज देशमुख लातूर ग्रामीण मतदारसंघात सातत्याने विकासाच्या योजना खेचून आणत असून मतदारांच्या अपेक्षा केवळ काँग्रेस पक्षच पूर्ण करु शकतो. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी आमदार धिरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहावे, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर तालुक्यातील सेलु (बु) व धनेगाव येथे दि. २० संप्टेंबर रोजी महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांशी संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख, डॉ. सारीकाताई देशमुख, सुनिता अरळीकर, जयश्री बरमदे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक युवराज जाधव, रेणा साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड. प्रविण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमूख म्हणाल्या कि, नुकत्यास संपलेल्या लोकसभेच्या निवडुकीत मतदारांनी भाजपा महायुतीला धडा शिकवत काँग्रेस महाविकास आघाडीला भरभरुन मतदान केले. काँग्रेस महाविकास आघाडीवर मतदारांनी विश्वास व्यक्त केले. तब्बल १० वर्षांनंतर डॉ. शिवाजी काळगे यांच्या रुपाने लातूर लोकसभेत काँग्रेस महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार धिरज देशमुख यांच्या प्रयत्नातून लातूर लोकसभेच्या विडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला. आगामी विधानसभा निवडणुकीतही मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीला शक्ती द्यावी, असे आवाहन केले.
देशातील गोर-गरीबांना १५ लाख रुपये देण्याचे अमिष भाजपाच्या नेत्यांनी दाखवले होते. त्यातील एक छदामही गरीबांना मिळाला नाही, असे नमुद करुन श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीने मतदारांना खोटी आश्वासने देऊन मतदारांची घोर निराशा केली. शेतक-यांच्या शेतीमालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, महिलांची सुरक्षा नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत. एकेकाळी प्रगत असलेला महाराष्ट्र या महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आज रसातळाला गेला आहे. त्यामुळे मतदारांनी या महायुतीला आता धडा शिकवावा, असेही त्यांनी सांगीतले.
याप्रसंगी भाग्यश्री दोरवे, उज्ज्वलाबाई सांडूर, वैशालीताई पाटील, मीरा जाधव, रोहिनी सांडूर, अनिता सांडूर, अनुसया सांडूर, उज्वला सुरवसे, शिवकन्या बेवणाळे, इंदुबाई सुरवसे, सारिका सांडूर, रुपाबाई सांडूर, मैणा सांडूर, सरस्वती सांडूर, सविता सांडूर, बालणबाई सांडूर, जनाबाई सांडूर, गीता सांडूर, मीराबाई बावणे, सुभद्रा घोडके, बालीका चेवले, कौशल्या थोरमोटे, विमल बेंबडे, सुशीला कोळेकर, मणकर्णा गायकवाड, जयश्री हाळे, रब्बाना शेख, पद्मीनी पांढरे, उर्मिला पांढरे, शालुबाई कोळेकर, महानंदा कोळेकर, कांताबाई शेळके, हरीबाई हाळे, गंगाबाई पाटील, सुमनबाई पाटील, विठाबाई पांचाळ, शारुबाई फावडे,  लक्ष्मी मेकले यासह आदी महिला उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR