लातूर : प्रतिनिधी
येथील एमआयडीसी भागातील जीवनरेखा प्रतिष्ठान संचलित महिला बीसीए महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले. या केंद्रात १५० जणांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या दूरदृश्य प्रणालीच्या अनुषंगाने जीवनरेखा प्रतिष्ठानच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्क्रीन उभारण्यात आले होते. या स्क्रीनवर थेट वर्धा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऑनलाईन मार्गदर्शन ऐकण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या महिला बीसीए महाविद्यालयातील ऑनलाईन दूरदृश्य प्रणाली कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून शासनाच्या प्रतिनिधी लातूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी अभिष्कता बिराजदार, जीवनरेखा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजयकुमार यादव, सचिव कृष्णा यादव, प्राचार्य संतोष त्रिमुखे, कौशल्य विकासचे समन्वयक मधूकर गादेकर, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर माने, विजयाताई माने, किशोर जैन, नितिन पडिले, खंडू सुरवसे आंिदची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपना चाकोते यांनी केले. आभार कृष्णा यादव यांनी मानले. लातूरच्या महिला बीसीए महाविद्यालयाच्या केंद्रात १५ ते ४५ वयोगटातील १५० विद्यार्थ्यांना ग्राफिक्स डिझाईन व ज्यूट प्रॉडक्टस् स्टिंिचग ऑपरेटर या दोन अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. हे अभ्यासक्रम २६० ते ३०० तास म्हणजे सुमारे तिन महिना कालावधीचे आहेत, अशी माहिती जीवनरेखा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार यादव यांनी दिल.ी.