29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरमांजरा साखर कारखान्यातर्फे ऊस पीक परिसंवाद 

मांजरा साखर कारखान्यातर्फे ऊस पीक परिसंवाद 

लातूर : प्रतिनिधी
देशभरात साखर उद्योगातील नावलौकिक असणा-या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना विलास नगर लातूर यांच्यावतीने राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा कारखान्याचे चेअरमन  दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी ऊस उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवून उसाच्या टनेज मध्ये वाढ करण्यासाठी कारखान्याच्या  कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या बाभळगाव, सलगरा (बु)चिंचोली (ब) गादवड, भादा व  आलमला ठिकाणी ठिकाणी ऊस पीक परीसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आले असून या उस पिकं परिसंवादाचा शुभारंभ लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते २४ सप्टेंबर रोजी बाभळगाव, ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी ८.३० वाजता  होणार आहे.
शेतक-यांना ऊस पिक उत्पादन घेत असताना पूर्व मशागत, बेणे निवड, लागवड पद्धत, बेणे प्रक्रिया, कीड रोग व तणांचे व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन, अंतर मशागत व खोडवा व्यवस्थापन इत्यादी बाबी व ऊस उत्पादनावर परिणाम करणा-या असतात त्याबाबीचे योग्य व्यवस्थापन करून उत्पादनात वाढ करणे हा ऊस पीक परीसंवादाचा उद्देश आहे.
त्यासाठी ऊस तज्ञ तथा कृषी कीटक शास्त्रज्ञ तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गन्ना मास्टर डॉ. अंकुश चोरमुले यांचे मार्गदर्शन ऊस पिक परीसंवादात होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी बाभळगाव येथे प्रारंभ झाल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सलगरा (बु) येथे तर २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता भादा  तालुका औसा खंडोबा मंदिर तर सायंकाळी ६.३० वाजता आलमला तालुका औसा महादेव मंदिरात व २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताचिंचोली (ब) येथील काळ भैरवनाथ मंदिर येथे तर सायंकाळी ६.३० वाजता गादवड तालुका लातूर येथील विठ्ठल मंदिर येथे उस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊस पीक परिसंवाद सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR