23.2 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeनांदेडना. पाटील यांचे नांदेडात जल्लोषात स्वागत

ना. पाटील यांचे नांदेडात जल्लोषात स्वागत

नांदेड: बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्र (हरिद्रा), वसमतचे  अध्यक्ष, तथा शिवसेना उपनेते ना. हेमंत पाटील यांना राज्य शासनाने नुकताच  मंत्री पदाचा दर्जा देऊन सन्मान केला आहे. मंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर  ना. पाटील प्रथमच नांदेड शहरात २१ सप्टेंबर रोजी आल्याने, त्यांचे नांदेडमध्ये  शिवसैनिक व समर्थकांनी रॅली काढून ढोल ताशांच्या गजरात सत्कार करत जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी क्रेन व जेसीबीने केली पुष्पवृष्टी केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाची धुरा हाती घेतल्यानंतर  हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वाधिक पीक असलेल्या हळद पिकाची लागवड व प्रक्रिया संदर्भात अभ्यास करून, वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र सुरू केले. शासन दरबारी दुर्लक्षित असलेल्या हळद पिकाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र  हळद संशोधन केंद्र सुरू केले.

ना. हेमंत पाटील यांच्या स्वागतासाठी नांदेड शहरात काढण्यात आलेल्या भव्य रॅली ला आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, संपर्क प्रमुख चितांगराव कदम ,सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय पईतवार, दर्शनसिंग सिंधू, आकाश रेड्डी,युवासेना जिल्हाप्रमुख संदेश हडसणीकर, नांदेड तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, वसमत तालुका प्रमुख राजू चापके, किनवट तालुकाप्रमुख बालाजी मूरकुटे, माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, नांदेड दक्षिण तालुका प्रमुख अशोक मोरे,उपजिल्हा प्रमुख बिल्लू यादव, जयवंत कदम, तालुका प्रमुख संतोष  भरसावडे,शहर प्रमुख सुहास खराणे महिला जिल्हा प्रमुख शीतल भांगे,वनमाला राठोड,गीता पुरोहित,तालुका प्रमुख स्नेहा पाटील,शहर प्रमुख लक्ष्मीताई दुधे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी नामदार हेमंत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती  शिवाजी महाराज ,महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर,यांनी क्रेनने पुष्पहार घालून पुष्पवृष्टी केली.एसपी ऑफिस जवळ शहर प्रमुख तुलजेश यादव, विजय यादव, स्वराज यादव, दत्ता पईतवार कलामंदिर येथे युवासेना जिल्हा प्रमुख अमोद साबळे,साई विभूते यांनी सत्कार केला तर शिवाजी नगर येथे डॉ.अंकुश देवसरकर यांनी क्रेन ने पुष्पहार घालून सत्कार केला तसेच श्रीनगर येथे श्री हेमंत पाटील यांचे सायन्स कॉलेज मधील माजी मित्र मंडळाच्या वतीने व शक्तीसिंग ठाकूर यांच्या वतीने भव्य सत्कार केला त्यानंतर राज कॉर्नर येथे उपजिल्हाप्रमुख सचिन किसवे, मंगेश कदम यांनी भव्य सत्कार केला.पुढे तरोडा नाका येथे जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, सदाशिव पुंड, राजू यादव, रावसाहेब कदम  यांनी सुद्धा भव्य सत्कार केले.

मंत्री पदाचा दर्जा देऊन सन्मान केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार यांचे आभार व्यक्त केले. तसेच नुकतेच या प्रकल्पास ८०० कोटींचा निधीची मान्यता मिळाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजुरी घेऊन प्रकल्पाच्या पुढील टप्यास सुरवात होणार आहे.
या प्रकल्पास हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या हळद पिकाला योग्य भाव मिळून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR