निलंगा : प्रतिनिधी
गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या अंतरवली सराटी येथील आमरण उपोषणाला पांिठंबा देण्यासाठी, शासनाच्या विरोधात सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक मुंडण आंदोलन करून शासनाचा निषेध केला तर अनेक मराठा समाज बांधवांनी ३०० फूट उंच टॉवरवर चढून शासनाचा निषेध केला.
गेल्या तेरा महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी विविध आंदोलने, रास्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण असे विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज बांधवांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना विविध आंदोलने करीत पांिठबा देत आहेत मात्र गेल्या तेरा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळत नाही. सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी केली जात आहे. मराठा संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस प्रकृतीचिंंताजनक होत आहे.
त्यांच्या तब्येतीची काळजीपूर्वक व गांभीर्याने विचार करावा तसेच आरक्षणासंबंधी तात्काळ सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येतील अशा तीव्र भावना सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी श्लोक दत्ता जाधव या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यांने मुंडण आंदोलन केले, तसेच राजेंद्र राघो या ंिलंगायत बांधवानीही मुंडण केले व गणेश सूर्यवंशी, डिगंबर जाधव, अंकुश धनुरे, चक्रधर शेळके, किरण पाटील, माधव वाडीकर यांच्यासह अनेक समाज बांधवांनी मुंडन केले आहेत. शेकडो मराठा समाज बांधव या मुंडण आंदोलनात सहभागी झाले होते.