28.7 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमनोरंजन‘नवरा माझा नवसाचा २’ ची दमदार कमाई

‘नवरा माझा नवसाचा २’ ची दमदार कमाई

मुंबई : प्रतिनिधी
‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विकेंडला या चित्रपटाने ७.८४ कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान, अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्या दमदार अभिनयाचा ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटास प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाचा पहिला भाग एकोणीस वर्षापुर्वी आला होता. त्यावेळी हा चित्रपट चांगलाच चालला होता. तर या सिनेमाची गाणी आजसुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच या चित्रपटाचा भाग दोन प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली असून, बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.

’‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंगपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाचे ६००पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल झाले होते. यामुळे वीकेंडला या चित्रपटाने ७.८४ कोटींची कमाई केली असून, प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाची निर्मिती, कथा पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून, संवादलेखन संतोष पवार यांनी केले आहे.

दरम्यान, गायक सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे या चित्रपटात पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून, प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडणार आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR