27.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रधावत्या एसटी बसमध्ये सासू-सास-याने जावयाचा गळा दाबून संपविले

धावत्या एसटी बसमध्ये सासू-सास-याने जावयाचा गळा दाबून संपविले

मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर नेऊन ठेवला

कोल्हापूर : धावत्या एसटी बसमध्ये सासू-सास-याने जावयाचा गळा दाबून खून केल्या प्रकार कोल्हापुरात घडला. मुलीला आणि नातवाला दारु पिऊन त्रास देणा-या जावयाला सासू-सास-याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपविले आहे.

गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला येणा-या विनावाहक गाडीत हा प्रकार घडलाय. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप शिरगावे असे खून करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. दरम्यान, जावयाची हत्या करणा-या सासू-सास-याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणा-या जावयाला सासू-सास-याने मिळून संपविले आहे. गडहिंग्लजवरून कोल्हापूरला येणा-या विनावाहक गाडीत गळा आवळून खून करण्यात आला आहे. दरम्यान सासू-सास-याने जावयाचा मृतदेह बस स्टँडवर नेऊन ठेवला होता. संदीप शिरगावे या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर आढळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR