लातूर : प्रतिनिधी
सात गुन्ह्यात फार असलेला आरोपी हा लातूर येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी येणार असल्याची पाळत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने ठेऊन त्याला व अन्य दोघा साथीदारास अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
करणसिंग लक्ष्मणसिंग बावरी व अर्जुनसिंग लक्ष्मणसिंग बावरी व अनिल धावारे रा. संजयनगर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघांनी मिळून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरुन ते एकदाच विकण्यासाठी वैशालीनगर येथील एका मदरशाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानातील गवतामध्ये लपवून ठेवलेल्या ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.
सराईत गुन्हेगार करणसिंग लक्ष्मणसिंग बावरी यांने वरील दोन साथीदारासह मिळून गणेश मंदिर, लातूर येथील एक पिकअप वाहन चोरून त्याच्या साह्याने बार्शी रोडवरील ए.टी.एम. तोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन नमूद आरोपीच्या विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे पण गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यापासून नमूद आरोपी फरार होता.
तसेच सराईत गुन्हेगार करणसिंग बावरी हा पोलीस ठाणे निलंगा, शिरूर आनंतपाळ, गांधी चौक, एमआयडीसी येथील प्रत्येकी एक गुन्ह्यात तर पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील दाखल तीन गुन्ह्यात फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कार्यवाहीमुळे ब-याच कालावधीनंतर करणसिंग बावरी हा पोलिसाच्या तावडीत सापडला असून त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास केल्याने अनेक गुन्ह्याची उकल होणार आहे. नमूद आरोपीला पुढील कार्यवाहीस्तव पोलीस ठाणे गांधी चौक यांचे ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, साहेबराव हाके, मनोज खोसे, राहुल कांबळे, राजेश कंचे मोहन सुरवसे, संतोष खांडेक यांनी पार पाडली.