25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींना मिळाला तिस-या टप्प्यातील लाभ

लाडक्या बहिणींना मिळाला तिस-या टप्प्यातील लाभ

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिस-या टप्प्याचे वितरण करण्यात आले. त्यात २६ सप्टेंबर रोजी ३८ लाख ९८ हजार ७०५ भगिनींना ५८४.८ कोटी रुपयांचे लाभ हस्तांतरण करण्यात आले. २९ सप्टेंबर रोजी ३४ लाख ७४ हजार ११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचे लाभ हस्तांतरण करण्यात आले. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

२५ सप्टेंबर रोजीही ३४ लाख ३४ हजार ३८८ भगिनींना १५४५.४७ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रतिमहिना १५०० रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. कागदपत्रांची त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्या महिलांनी बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR