25.4 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीस मध्यरात्री ‘मातोश्री’वर?

फडणवीस मध्यरात्री ‘मातोश्री’वर?

‘वंचित’च्या दाव्यामुळे खळबळ

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिल्याचा दावा केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ‘एक्स’वर व्हीडीओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे. यासंबंधी ठाकरे गट किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत हे २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता ७ डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: गाडी चालवत एकटेच ‘मातोश्री’ बंगला येथे गेले, दोन तास त्यांची बैठक झाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ‘एक्स’वर व्हीडीओतून केला आहे.

ठाकरे गटावर वंचितचे आरोप
वंचित बहुजन आघाडीला मिळालेली माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. आरक्षणवादी मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचं पक्कं माहिती आहे. मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केले आहे, असे मोकळे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR