25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाचे अरबट यांच्या गाडीवर गोळीबार

शिंदे गटाचे अरबट यांच्या गाडीवर गोळीबार

शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये वाद

अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या गाडीवर गोळीबाराची घटना घडली आहे. गाडीवर गोळीबाराच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार झाला. या गोळीबारानंतर अमरावतीत वलगाव पोलिस स्टेशनचे फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. ज्या गाडीवर गोळीबार झाला त्या गाडीची तपासणी केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे अमरावती जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिसांत गोळीबार प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पक्षांतर्गत व पदाधिका-यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिंदे गटाचे गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार झाला अशी तक्रार गोपाल अरबट यांनी पोलिसांत केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR