मुंबई : महिलांवरील वाढत्या अत्याचा-याच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असली, तरी बलात्काराच्या घटनांची मालिका सुरूच आहे. मुंबईत अशीच एक घटना समोर आली असून बापच मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार करत होता. १७ वर्षीय पीडिता घर सोडून निघून गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. वयाच्या १२ व्या वर्षापासून बाप अत्याचार करत असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांकडून सतत अत्याचार होत असल्याने १७ वर्षीय पीडिता घर सोडून निघून गेली. पीडितेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. पोलिसांनी अल्पवयीन पीडितेचा शोध घेतला. पीडिता सापडल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. ज्यावेळी १७ वर्षीय पीडितेने जे सांगितले, ते ऐकून पोलिसही हादरले. पीडितेला दोन मोठे भाऊ आणि आई आहे, तिघांचीही मानसिक अवस्था चांगली नाही.
वडील अत्याचार करतानाचा व्हीडीओ
१२ वर्षाची असल्यापासून पीडितेवर तिचा बाप अत्याचार करत होता. बाप अत्याचार करत असतानाच प्रकार तिने व्हीडीओमध्ये शूट केला होता. पोलिसांनी ज्यावेळी तिची चौकशी केली, तेव्हा तिने होत असलेल्या अत्याचाराची आपबीती सांगितली. त्याचबरोबर व्हीडीओही दाखवला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. नराधम बापाला अटक करून चौकशी केली. बापाने गुन्ह्याची कबूली दिली.
बापाला कठोरता कठोर शिक्षा करा
पीडितेने पोलिसांना सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराबद्दल तिने तिच्या भावांना सांगितले नाही. कारण ते मारहाण करतील अशी भीती तिला वाटत होती. ४६ वर्षीय आरोपी म्हणजे पीडितेचा बाप महालक्ष्मी रेसकोर्समध्ये माळी काम करतो. बापाला कठोरता कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पीडितेने पोलिसांकडे केली. मुंबई पोलिस गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता यांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या यूनिट ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस उप निरीक्षक समीर मुजावर, पोलिस उपनिरीक्षक अशोक राणे, गणेश गोरेगावकर, हवालदार विनोद परब, विनोद घाटकर, समीर जगताप, विलास चव्हाण आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल दीपिका ठाकूर, हर्षला पाटील यांच्या पथकाने शोध घेऊन आरोपीला अटक केली.