20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeराष्ट्रीयऑपरेशन अंतिम टप्प्यात; कामगार बोगद्यातून लवकरच बाहेर

ऑपरेशन अंतिम टप्प्यात; कामगार बोगद्यातून लवकरच बाहेर

डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी हे उत्तरकाशी येथील निर्माणाधीन बोगद्याच्या घटनास्थळी पोहोचले आहेत. ऑपरेशन अंतिम टप्प्यात असून बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. कामगार कधीही बोगद्यातून बाहेर पडू शकतात, असे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. ४१ मजूर १७ दिवसांपासून बोगद्यात अडकले आहेत. तेंव्हापासून त्यांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी डॉक्टरांची टीमही सज्ज आहे. बोगद्याच्या तोंडावर रुग्णवाहिका सज्ज आहेत.

बोगद्यात मॅन्युअल ड्रिलिंग करत असलेल्या रैट माइनर्स कामगारांनी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे, ते आत अडकलेल्या कामगारांपासून फक्त ३ मीटर दूर आहेत. पाच वाजेपर्यंत सर्वांना बाहेर काढता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिल्क्यरा बोगद्याच्या बाहेर डॉक्टरांच्या टीमसह ४१ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, जेणेकरून कामगार बाहेर येताच त्यांना आवश्यकतेनुसार उपचार करता येतील. एनडीआरएफची टीमही स्टँडबायवर आहे.

लवकरच चांगली बातमी येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सर्व ४१ मजुरांना लवकरात लवकर बाहेर काढले जाईल. उत्तरकाशीमध्ये सिल्क्यरा बोगद्यात ४१ मजूर गेल्या १७ दिवसांपासून अडकले आहेत. पाऊस आणि थंडी असतानाही खोदकाम वेगाने सुरू आहे. मॅन्युअल ड्रिलिंगसाठी तीन टीम कार्यरत आहेत. गेल्या १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपद्वारे अन्न आणि पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय वॉकी टॉकीच्या माध्यमातून त्यांच्याशी सातत्याने बोलणे सुरू आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR