25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeलातूरम.वि. आ.च्या भावी आमदारांना निवडून द्या; कामाची गॅरंटी माझी

म.वि. आ.च्या भावी आमदारांना निवडून द्या; कामाची गॅरंटी माझी

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांना आपण मोठ्या मताधिक्याने मागच्या पाच वर्षापूर्वी निवडून दिले. त्यांनी अतिशय चांगले कार्य करीत सामान्य माणूस, शेतक-यांच्या प्रश्नावर अनेक विषय सभागृहात मांडून आवाज उठवला तसेच विकासाची अनेक कामे त्यांनी केली आहेत. असे सांगून लवकरच आपल्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा धीरज देशमुख यांना मोठा आशिर्वाद द्यावा तसेच जिल् तील महाविकास आघाडीच्या भावी आमदारांना निवडून द्या विकास कामांची गॅरंटी माझी, अशी घोषणा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केली. त्यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी टाळयांचा प्रचंड कडकडाट करीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना दाद दिली.
औसा तालुक्यातील टाका येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टाका शाखेच्या नूतन प्रशस्त इमारतीच्या स्थलांतर सोहळ्याचे दि. ४ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख हे होतें तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख,   जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नारायणराव लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेंद्रनाथ भादेकर, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी संचालक संदीपान शेळके, मांजरा साखर कारखान्याचे संचालक  सदाशिव कदम, संचालक शेरखा पठाण, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अमरसिंह भोसले, टाक्याचे चेअरमन गोरख सावंत, सरपंच लक्ष्मीबाई बंडगर, सचिन दाताळ, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, राजकुमार पाटील अनुप शेळके, जयेश माने संचालिका स्वयंप्रभा पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, मोदी गॅरंटी तुम्ही अनुभवली आहेच  पण माझी गॅरंटी लातूरकरांना व आपल्याला मारुती महाराज साखर कारखान्याच्या बाबतीत माहीतच आहे. मी लातूर जिल्ह्यातील  जनतेला गॅरंटी देतो की जिल्ह्यातील सर्व सहाही विधानसभा मतदार  संघातील महाविकास आघाडीच्या भावी आमदारांना निवडून द्या त्यांच्या कामाची जबाबदारी माझी गॅरंटी राहील, अशी घोषणा त्यांनी केली. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर परिवाराने गेल्या ४० वर्षात शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सुरु केले ते पुन्हा अधिक मजबूत करण्यासाठी आपले लोक निवडून आले पाहिजेत, असे सांगून धीरज देशमुख यांच्यासह अमित देशमुख तसेच जिल्ह्यातील  महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले तसेच जिल्हा बँकेने वेगवेगळया योजना राबवून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कमी व्याजात कर्ज पुरवठा करत लोकांना आधार, रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम केल्याबद्दल बँकेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, श्रीशैल्य उटगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक टाका सोसायटीचे चेअरमन गोरख सावंत यांनी केले. यावेळी विलास पाटील, रामचंद्र शिंदे, विजय कदम, मारुती महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, हरिराम कुलकर्णी, प्रकाश शिंदे, जगदीश शिंदे, दिलीप चव्हाण, जिल्हा बँकेचे विविध खाते प्रमुख अधिकारी, टाका येथील शाखेचे व्यवस्थापक, सोसायटीचे संचालक ग्रामस्थ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR