27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रबीडमधील बँकेत १३ कोटींचा अपहार; सत्यभामा बांगर यांना अटक

बीडमधील बँकेत १३ कोटींचा अपहार; सत्यभामा बांगर यांना अटक

बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाटोदा येथील महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामकृष्ण बांगर यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना पाटोदा पोलिसांनी अटक केली आहे. १३ कोटींच्या अपहार प्रकरणी ही अटक करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सन २०११ ते २०१५ कालावधी दरम्यान महात्मा फुले अर्बन बँकेमध्ये १३ कोटींचा बनावट दस्तावेज सादर करून सत्यभामा बांगर यांनी अपहार केल्याचा आरोप आहे. रामकृष्ण बांगर यांनी देखील पाटोदा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना बाजार समितीची जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात देखील गुन्हा नोंद झाला होता. आता त्यांच्या पत्नी बँकेच्या अपहार प्रकरणात अडचणीत आल्या असून त्यांना अटक झाली आहे.

सत्यभामा बांगर यांनी कोणतीही कागदपत्रं न घेता, तारण न घेता बनावट कागदपत्रं तयार करून ती खरी असल्याचे भासवून १३ कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. आता याच प्रकरणात बांगर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

तीनशे कोटींचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटचा अध्यक्ष बबन शिंदे याला उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता आणि तो पोलिसांना चकवा देत होता.
बीडसह जिल्ह्यात पाच ठिकाणच्या शाखांमधून बबन शिंदे याने तीनशे कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षापूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला. या प्रकरणात बीडसह पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. आता बीड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR