23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeक्रीडाआयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्या तिस-या स्थानी

आयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्या तिस-या स्थानी

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मोठी झेप

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणा-या टी-२० सामन्यांच्या मालिकेदरम्यान आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंपैकी एक असलेल्या हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. बांगलादेशविरुद्ध अजून दोन सामने बाकी आहेत, जर हार्दिकने या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली तर तो नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. आता त्याच्या पुढे फक्त दोनच खेळाडू आहेत.

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी-२० क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग सध्या २५३ आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी दुस-या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग २३५ आहे. भारताच्या हार्दिक पांड्याने सलग चार स्थानांनी झेप घेत तिस-या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग सध्या २१६ आहे. याआधीही तो पहिल्या क्रमांकावर होता, मात्र त्यानंतर तो खाली गेला होता. आता पुन्हा त्याने गरुडझेप घेतली आहे.

हार्दिक पांड्यावर आल्यामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान झाले आहे. मार्कस स्टॉइनिस आता एक स्थान गमावून २११ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझालाही एक स्थान गमवावे लागले असून तो आता २०८ च्या रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. वांिनदू हसरंगा सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग २०६ आहे. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीचीही एका स्थानावर घसरण झाली आहे. तो २०५ रेटिंगसह ७ व्या क्रमांकावर आहे. याशिवाय टॉप रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने बॉल आणि बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने चार षटके टाकली आणि २६ धावा दिल्या आणि एक विकेट घेतला. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने केवळ १६ चेंडूत ३९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि दोन षटकार आले आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याचा फायदा त्याला यावेळी रँकिंगमध्ये मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR