28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रयावेळी रावणाचे अखेरचे दहन

यावेळी रावणाचे अखेरचे दहन

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसेच शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दस-याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा होता. शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होतो. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात, मेळावे करतात. ज्या शिवसेनची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोने दस-याला महाराष्ट्राला देत राहिले. ती परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवली आहे. तुम्ही पक्षाचे चिन्ह नाव चोरले असेल तरीही विचार आणि जनता ही मूळ शिवसेनेच्या बरोबर आहे. शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. जो निवडणूक आयोग मोदी शाहांच्या मेहरबानीवर चालतो त्यांना अधिकार नाही. मुंबईतला दसरा मेळावा विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असे संजय राऊत म्हणाले.

दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाईल. पिपाण्या चालणार नाहीत. आज नक्कीच एक दिशा महाराष्ट्राला लाभेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या विजयाची मानकरी ठरली. विधानसभाही त्याच पद्धतीने जिंकू. आमच्याकडचा धनुष्यबाण मोदी आणि शहांच्या मदतीने चोरण्यात आला. देशाचे पंतप्रधान यांना मदत करत असतील तर हा देश चोरांच्या हाती आहे असं म्हणावे लागेल. आमच्याकडे मशाल आहे आणि हे सर्वात मोठे हत्यार आहे असेही संजय राऊत म्हणाले.

सत्तेत बसलेले रावण मुंबई लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे रावणाचे दहन यावेळी अखेरचे दहन असेल. त्यानंतर या महाराष्ट्रात नवीन रावण निर्माण होऊन याची काळजी आम्ही घेऊ असे संजय राऊतांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR