28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रजामनेरमधून गिरीश महाजनांना उमेदवारी

जामनेरमधून गिरीश महाजनांना उमेदवारी

जामनेर : विधानसभा निवडणुकांसाठी काहीच दिवस उललेले असताना विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रमुख सामना पाहायला मिळणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली असून यावेळी गिरीश महाजनांनी निवडणूक लढवावी २०२९ ला मात्र त्यांच्या पत्नीस उमेदवारी देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

गिरीश महाजन यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मते त्यांच्या पत्नीला मिळतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जामनेर येथे शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, २०२९ मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. २०२९ मध्ये साधना वहिनीच (गिरीश महाजन यांच्या पत्नी) निवडणूक लढणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. गिरीश महाजन यांच्या पत्नीची उमेदवारी थेट जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक लढवावी. पण २०२९ मध्ये गिरीश महाजन यांना तिकीट न देता त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना उमेदवारी देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र, ते शक्य नसून गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं केवळ साधना महाजन याच घेऊ शकतात असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR