मुंबई : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने मुंबईत खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दाही ज्वलंत बनला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची वेगवेगळी कारणे चर्चेत आहे. एसआरए प्रोजेक्टमधून त्यांची हत्या केली गेली, असेही बोलले जात आहे. आता केआरकेने (कमाल आर खान) केलेल्या काही ट्विटने रिअल इस्टेट कनेक्शनमधून सिद्दिकींची हत्या झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेता, चित्रपट समिक्षक असलेल्या केआरकेने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर एक पोस्ट केली आहे. केआरकेने आधी बाबा सिद्धिकींवर टीका करणारे ट्विट केले आहे. जशी करणी, तशी भरणी. माहिती नाही किती लोकांच्या जागा जबरदस्तीने हडपल्या होत्या. कुत्र्यासारखा मृत्यू झाला. आज त्या सगळ्या पिडलेल्या लोकांना दिलासा मिळाला असेल”, असे केआरकेने त्यांच्या एका पोस्ट म्हटले आहे.
डी कंपनीने बाबा सिद्दिकी यांना २०१३ मध्ये धमकी दिली होती आणि एक भूखंड खाली करायला सांगितलं होतं. हा भूखंड त्यांनी हिरावून घेतला होता. बाबाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यांना पोलीस सुरक्षाही मिळाली होती. अनेक भूखंड हडपल्याच्या प्रकरणात बाबा सिद्धिकी आरोपी होते. वृत्तांनुसार डी गँगने त्यांना कारणांमुळे संपवले असेल. ते काही प्रॉपर्टी सोडत नसल्यान किंवा डी गँग मुंबईत कुणालाही संपवू शकते, हे सिद्ध करण्यासाठी हे केलं असेल”, असे केआरकेने म्हटले आहे.