मुंबई : आज इंडिगो एअरलाइन्सच्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना आणि मुंबईहून न्यूयॉर्कला जाणा-या एका एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने मुंबई विमानतळावर चांगलीच खळबळ उडाली. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणा-या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर दिल्ली विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. तर फ्लाइट ६ ई १२७५ मुंबईहून मस्कतला जात होती. दूसरी इंडिगो फ्लाइट ६ ई ५६ मुंबईहून जेद्दाहला जात होती. या दोन्ही फ्लाइटला उडवून देण्याची धमकी आली होती.
या आधी आज पहाटे २ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टहून निघाले होते. त्यानंतर एक ट्विटवरून धमकी मिळाल्याने हे फ्लाइट दिल्लीत तातडीने उतरवण्यात आले आणि विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात काहीही आढळून आले नाही.
त्यानंतर एअर इंडियाने एक निवेदन जारी केले. १४ ऑक्टोबर रोजी मुंबईहून न्यूयॉर्कला साठी उड्डाण भरणारी फ्लाइट एअर इंडिया ११९ ला एक स्पेशल सेक्युरिटी अलर्ट मिळाला. आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या आदेशानंतर ही फ्लाइट दिल्लीला डायव्हर्ट करण्यात आली. सर्व प्रवाशांना दिल्ली विमानतळावर उतरवले. असे, एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.