28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी' शस्त्रक्रिया नाही, रुटीन चेकअप

उद्धव ठाकरेंवर ‘अँजिऑप्लास्टी’ शस्त्रक्रिया नाही, रुटीन चेकअप

आदित्य ठाकरेंनी दिली माहिती

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी नियमित तपासणीसाठी मुंबईतील एच.एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी गेले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या रुग्णालयातील तपासण्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. नियमित तपासण्यासाठी करण्यासाठी सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे रुग्णालयात गेले होते. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR