23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयदुस-या महायुद्धातील बॉम्ब केला निकामी

दुस-या महायुद्धातील बॉम्ब केला निकामी

बर्लिन : जर्मनीच्या हॅम्बुर्ग प्रांतात दुस-या महायुद्धातील बॉम्ब सापडला. शनिवारी स्टर्नशांजे जिल्ह्यात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर ३०० मीटरच्या परिघात राहणा-या सुमारे ५ हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याशिवाय पोलिसांनी परिसरातील रेस्टॉरंट आणि बारही बंद केले होते. पोलिस अधिका-यांंनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक शाळेच्या बांधकामादरम्यान ते सापडले.

बॉम्ब सुरक्षितपणे निकामी करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. डिफ्यूज करण्यासाठी अर्धा तास लागला. बॉम्ब सापडल्याने जिल्ह्यातील रेल्वे सेवाही बंद ठेवावी लागली. जर्मनीमध्ये दुस-या महायुद्धातील बॉम्ब सापडणे सामान्य आहे, जे नंतर निकामी केले गेले. ३ ऑक्टोबर रोजी जपानच्या दक्षिणेकडील मियाझाकी विमानतळावर बॉम्बस्फोट झाला. दुस-या महायुद्धात अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकला होता. मात्र, त्याचा स्फोट झाला नाही. यामुळे ते दडपून राहिले. विमानतळाच्या टॅक्सी-वेच्या बाजूला हा बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटानंतर विमानतळावरील उड्डाणे रद्द करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR