16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अजूनही संधी, शनिवारपर्यंत मुदत

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अजूनही संधी, शनिवारपर्यंत मुदत

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती

मुबंई (प्रतिनिधी) मतदार यादीत आपले नाव आले नसेल तर शनिवारपर्यंत तुम्हाला मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवल्यास या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मतदानाची संधी मिळू शकते त्यामुळे तातडीने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे जेणेकरून मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे त्यामुळे आपले नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे. १९ ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नावनोंदणी करण्याची संधी आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR