16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरकत्तीने गळयावर वार करून तरुणाची हत्या

कत्तीने गळयावर वार करून तरुणाची हत्या

आरोपी फरार जुन्या रेल्वे लाईन रोडवरील तोडकर एजंन्सी दुकानासमोरची घटना

लातूर : प्रतिनिधी
मागील प्रकरणाचा राग मनात धरून कत्तीने हातावर, छातीवर व गळयावर वार करून ३७ वर्षीय तरूणाचा खून केल्याची घटना गुरूवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दयानंद गेट जवळील जुन्या रेल्वे लाईन रोडवरील तोडकर एजंन्सी दुकाना समोर घडली. आठवडाभरानंतर खुनाची ही तिसरी घटना घडल्याने सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

खाडगाव रोडवरील बाबा नगर येथील शिवाजी उर्फ अनिल त्र्यंबक देवकर (वय ३७ वर्ष) हे सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दयानंद गेट जवळील जुन्या रेल्वे लाईन रोडवरील तोडकर एजंन्सी दुकाना समोर आले असता बाबा नगर येथीलच कृष्णा सुनिल मुद्दे व अजय सुनिल मुद्दे, पद्मिनी सुनिल मुद्दे यांनी कट रचून शिवाजी देवकर यांच्यावर कत्तीने वार करून खून केला. देवकर यांच्या उजव्या हातावर, डाव्या छातीवर व मानेवर कत्तीने वार केल्याने ते रस्त्यावर रक्ताच्या थारोळयात पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना पोलिसांनी समजताच शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटना स्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी नेण्यात आले.

आरोपींच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत नातेवाईकांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणी विमल देवकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कलम १०३ (१), ६१ (२), भा. न्या. सं. ४, २५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी पाटील हे करीत आहेत.

आरोपींच्या तपासासाठी दोन पथके रवाना
मागील प्रकरणाचा राग मनात धरून युवकाचा खुन करून कत्ती युवकाच्या गळयावर ठेवून आरोपी घटना स्थळावरून फरार झाले. त्यांच्या शोधासाठी शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखा अशी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींनी ज्या कत्तीने वार करून खून केला ती पोलिसांनी जप्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR