26.8 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाकालच्या गाभा-यात बंदी फक्त सामान्यांसाठी;विरोधक आक्रमक

महाकालच्या गाभा-यात बंदी फक्त सामान्यांसाठी;विरोधक आक्रमक

 खासदार श्रीकांत शिंदेंची शिवलिंग पूजा

उज्जैन : प्रतिनिधी
महाकाल मंदिरामध्ये गाभा-यामध्ये दर्शन घेण्यास बंदी आहे. मागील वर्षभरापासून ही बंदी आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दर्शन घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगामधील एक देवस्थान म्हणजे उज्जैनमधील महाकाल. या देवस्थानाला भाविकांची मोठी गर्दी होत असते.

या मंदिरामध्ये गाभा-यामध्ये जाऊन दर्शन घेणे किंवा पूजा करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ पुजारी वर्गाला मंदिराच्या गाभा-यामध्ये जाऊन पूजाअर्चा करता येते. मात्र सध्या नवीन वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गाभा-यामध्ये जाऊन देवाची पूजा केली आहे.

त्यामुळे ही बंदी फक्त सामान्यांसाठी असून व्हीआयपी लोक मात्र सहज आतमध्ये जात आहेत, असा घणाघात विरोधक करत आहेत.
सोशल मीडियावर खासदार श्रीकांत शिंदे यांचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गाभा-यातील आहे. या व्हीडीओमध्ये गाभा-यामध्ये व्यवस्थापन व काही पुजारी दिसत आहेत.

त्याचबरोबर इतर काही व्यक्तीही दिसत आहेत. यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या पत्नीदेखील असल्याचा दावा व्हीडीओवरून करण्यात येत आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. सामान्य भक्तांना गाभा-यात जाऊन दर्शन वा पूजा करण्यास बंदी असताना व्हीआयपी लोक आणि राजकीय लोकांना प्रवेश कसा दिला जातो? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. याची दखल उज्जैन प्रशासनानेदेखील घेतली असून महाकालेश्वर मंदिराच्या गाभा-यामध्ये जाण्याची परवानगी नसताना प्रवेश कसा दिला याची चौकशी व्हावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

महाकालेश्वर यांना सुबुद्धी देवो : काँग्रेस
काँग्रेसचे स्थानिक आमदार महेश परमार यांनी टीका केली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असोत किंवा भाजपाचे इतर मंत्री किंवा नेतेमंडळी असोत, दादागिरी करून गाभा-यात जातात. मला वाटतं की हे राजेशाहीत जगत आहेत. एकीकडे ज्यांच्या मतांच्या जोरावर हे खासदार-लोकप्रतिनिधी झाले, ते ५० फूट लांबून दर्शन घेतात. त्यासाठी ६ ते ८ किलोमीटर चालत येतात. त्यामुळे मला वाटतं हे १०० वर्षांपूर्वीच्या राजेशाहीत जगत आहेत. प्रभू महाकालेश्वर यांना सुबुद्धी देवो, अशी टीका त्यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR