17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरमानवी तस्करीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘वॉक फॉर फ्रिडम’

मानवी तस्करीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘वॉक फॉर फ्रिडम’

लातूर : प्रतिनिधी

येथे मानवी तस्करीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘वॉक फॉर फ्रीडम’चे आयोजन करण्यात आले होते. दि. १९ ऑक्टोबर रोजी युवा रुरल असोसिएशन, लातूर आणि द मूव्हमेंट इंडिया, मुंबईमार्फत लातूर शहरामध्ये अनैतिक मानवी वाहतूक विरोधी ‘वॉक फॉर फ्रीडम’ हा मानवी तस्करी संपवण्यासाठी जागतिक समन्वित प्रयत्न आहे, जो जगभरातील ५० पेक्षा जास्त देश आणि ५०० हून अधिक ठिकाणी आयोजित केला जातो.

लातूर येथील सदर वॉकची सुरुवात म.बसवेश्वर महाविद्यालय येथून झाली. याठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. सुजाता माने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सद्दाम शेख (कार्यक्रम समन्वयक युवा रूरल असोसिएशन) यांनी केले.

मानव तस्करी हा अत्यंक गंभीर स्वरूपाचा प्रश्न समाजासमोर असल्याचे सांगितले. वॉकच्या प्रारंभी उपस्थितांना मानवी तस्करीची चिन्हे,संशयास्पद परिस्थिती आढळल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १०९८ (संकटात असलेल्या मुलांसाठी चाइल्डलाइन हेल्पलाइन), १८१ (महिलांसाठी राष्ट्रीय पोलिस हेल्पलाइन), आणि ११२ (राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद). या वेळी मानवी तस्करी संपवण्यासाठी सक्रिय कृती करणा-या नागरिकांनी सतर्क राहण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राधाकृष्ण देशमुख (अध्यक्ष बालकल्याण समिती) होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ संजय गवई होते. यावेळी उपस्थित सर्व सहभागींनीना अनैतिक मानवी तस्करी विरोधातील घोषणा व शपथ वाचन सुचेता वाघमारे (माजी उपप्राचार्य शाहू महाविद्यालय) यांच्या मार्फत करण्यात आले. डॉ संजय गवई यांनी ‘वॉक फॉर फ्रीडम’चा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

ही रेली महात्मा बसवेश्वर कॉलेज ते गांधी चौक-मिनी मार्केट पासून निघून रेलीची सांगता ही महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथे करण्यात आली.

सदर कार्य्क्रमध्ये युवा रुरल असोसिएशनचे क्षेत्र समन्वयक अमोल गायकवाड, प्रदीप कांबळे, प्रा.डॉ.मौने, प्रा.आशिष स्वामी आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक, एसओएस कुटुंब सक्षमीकरण प्रकल्प मधील मुले, महिला व बालविकास विभाग मधील जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन कार्माचीरी, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथील विद्यार्थी, विद्यापीठ उपकेंद्र येथील समाजकार्य विभाग मधील विद्यार्थी, आदर्श महिला गृह उद्योग सहकारी आणि स्वयंसेवक असे एकूण २२० जणांनी सहभाग नोंदवला. सरोज पवार समन्वयक एसओएस कुटुंब सक्षमीकरण प्रकल्प यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR