15.6 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुतीमध्ये भाजपने बाजी मारली असून, पक्षानं आज उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये ९९ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे.

उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना अनेक ठिकाणी भाजपनं पूर्वीच्याच आमदारांना संधी दिल्याचं दिसून येत आहे. आता भाजपनंतर लवकरच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पूर्वीच्या दोन आमदारांचं तिकिट कापण्यात आलं आहे. कामठी मतदारसंघामध्ये भाजपचे टेकचंद सावरकर हे आमदार होते. मात्र यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडेचिंचवड विधानसभा मतदार संघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी भाजपकडून शकंर जगताप हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळची निवडणूक महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच भाजपकडून आता उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये ९९ उमेदवारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील आता लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दानवेंच्या मुलाला तर चव्हाण यांच्या मुलीला संधी
या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

भाजपची पहिली उमेदवार यादी
नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण

जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते

नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – क्षीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड

हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास याबद्दल आपण पक्षाचे आभारी असून हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, तसेच आपल्यासमोर कोणाचीही आव्हान नसल्याची प्रतिक्रिया अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख काय म्हणाले?
सुभाष देशमुख म्हणाले, मोदी, शाह आणि फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. देशात लोकशाही आहे, तशी भाजपमध्ये देखील लोकशाही आहे. त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता इच्छा व्यक्त करतं असतो. तशी इच्छा भाजपकडे अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र पक्ष सर्व्हे करत असतो, जो उमेदवार सक्षम असतो त्याला पक्ष संधी देतो. युतीच्या सरकारने जे कामे केलय, राज्याला दिशा देण्याचे काम या सरकारने केले. राज्याला वैभवशाली करण्यासाठी पुन्हा एकदा याचं सरकारला जनता संधी देईल. दक्षिण सोलापुरात देखील अनेक कामे केले, रस्ते पाणी असे विकासकामे झाली.

अकोला जिल्ह्यात भाजपच्या चारपैकी एका आमदाराला पुन्हा संधी….
अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यात आजच्या पहिल्या यादीत अकोला पूर्वचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना राळेगावचे यांना पुन्हा संधी देत उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अकोला पश्चिम, अकोट आणि मुर्तीजापूर या तीन मतदार संघातील उमेदवार अजून ठरले नाही. त्यामूळे अकोटमधून प्रकाश भारसाकळे, मुर्तिजापूरमधून हरीश पिंपळे हे विद्यमान आमदार वेटींगवर आहेत. तर दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या अकोला पश्चिममध्ये भाजप कोण नवा उमेदवार देणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR