21.4 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeमहाराष्ट्र३७ मतदारसंघात बंडखोरी अटळ!

३७ मतदारसंघात बंडखोरी अटळ!

मुंबई : प्रतिनिधी
२०१९ मधील निवडणुकीत ३७ विधानसभा मतदारसंघांतील विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे पाच हजार पेक्षाही कमी होते. यावेळी हे मतदारसंघ कोणाला साथ देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. अगदीच हातघाई झालेल्या जागांवरील निकाल एकूणच जय-पराजयासाठी निर्णायक ठरतील.

महायुती व मविआमध्ये किमान ३७ मतदारसंघ असे आहेत की, जिथे पहिले समोरच्यांनी उमेदवारी जाहीर करण्याची वाट पाहिली जात आहे. उमेदवारी नाकारल्याने आपल्याकडचे इच्छुक दुसरीकडे जातील, अशी शंका महायुती आणि मविआ या दोघांनाही वाटत आहे.

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती. या ३७ मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत. गेल्यावेळी आमने-सामने असलेले दोघेही आज महायुतीत किंवा महाविकास आघाडीत आहेत. युती वा आघाडीला बंडखोरीचा फटका कमी मताधिक्याने निकाल दिलेल्या मतदारसंघात बसू शकतो. कमी फरकाने ज्ािंकलेले आणि हरलेले दोघेही महायुतीत वा महाविकास आघाडीत आहेत, अशा ठिकाणी बंडखोरीची शक्यता अधिक असण्याची शक्यता आहे.

भाजपच्या २४ आमदारांना डच्चू!
भाजपच्या सुमारे २४ विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. ही रणनीती अंमलात आणण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आली असून त्यातील बहुतेकांनी उमेदवार यादी जाहीर करण्याची घाई करू नका, असे मत दिले आहे.

ग्राफिक/चौकट
५ उमेदवारांना १ हजारपेक्षाही कमी मते
४ उमेदवारांना १ ते २ हजार मताधिक्य
१२ उमेदवारांचे मताधिक्य २ ते ३ हजार
८ उमेदवारांचे मताधिक्य ३ ते ४ हजार
८ उमेदवारांना ४ ते ५ हजार मताधिक्य

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR