18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या देवळा-चांदवड मतदार संघातील भाजपच्या नगरपंचायतच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष अशा १५ नगरसेवकांसह २ स्वीकृत तसेच अन्य सेलच्या पदाधिका-यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारीच्या नाराजीतून हे राजीनामे दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नाशिकच्या देवळा-चांदवड मतदार संघातील भाजपच्या नगरपंचायतच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष अशा १५ नगरसेवकांसह २ स्वीकृत तसेच अन्य सेलच्या पदाधिका-यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चांदवड-देवळा मतदार संघातून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेत आपले चुलत बंधू केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी अशी पक्षाकडे मागणी केली होती.

सख्खे भाऊ भिडणार!
राहुल आहेर यांनी माघार घेतल्याने केदा आहेर यांना उमेदवारी मिळेल, असे मानले जात होते. मात्र पहिल्या यादीत डॉ. राहुल आहेर यांचे नाव आल्याने देवळा येथील केदा आहेर यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे त्यांनी आज आपल्या पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे केदा आहेर हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चांदवड-देवळा मतदार संघात दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या मैदानात आमने- सामने येणार आहेत.

दिंडोरीमध्येही बंडाचा झेंडा
दुसरीकडे नाशिकच्या दिंडोरीमध्येही महायुतीच्या इच्छुकांनी बंडाचे झेंडे फडकावण्याचा इशारा दिला आहे. दिंडोरीचे माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते धनराज महाले हे लढण्यास इच्छुक होते, मात्र दिंडोरीची जागा अजित पवार गटाला सुटल्याने आणि नरहरी झिरवाळ यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्याने धनराज महाले बंडाच्या तयारीत असून २४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा धनराज महाले यांचा निर्णय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR