22.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeपरभणीरांगोळीद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

रांगोळीद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

कौसडी : मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. २१ ऑक्टोबर रोजी जि. प. शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये मुलांनी मतदानाच्या जनजागृती विषयी विविध रांगोळ्या काढल्या. त्याचबरोबर ज्ञानेश्वर बर्वे यांनी मतदान जनजागृतीच्या निमित्ताने सुंदर रांगोळी शाळेच्या परिसरामध्ये काढून मतदान जनजागृती विषयी शाळेतील मुलांना तसेच गावातील नागरिकांना मतदानाविषयी जागृत राहण्याचे आवाहन केले.

मतदान हे असे एक सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्यामुळे लोकशाही बळकट होते हे रांगोळीतून सांगण्यात आले. सदरील रांगोळी स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुनिता गांजरे, मीरा कुंभारे, स्वप्ना वैद्य, वंदना रेवतकर, सुरेखा खरटमोल, सारीका कदम, हजरा शेख, उषा शेळके, गजानन पांचाळ, मनोज भालेराव, गणेश काळे, अभिजीत मोरे, कुंडलिक राठोड, दशरथ भिसे व शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR