सोलापूर : सोलापूरात आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत शहरातील काही प्रतिष्ठित व अभ्यासक व्यापारी उद्योजक, कारखानदार तसेच शहरातील साहित्यिक यांच्या बरोबर संवाद साधण्यास स्रेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील साहित्यिक उपस्थित होते. उपस्थित साहित्यिकांकडून निवेदन देण्यात आले.
भारत स्वतंत्र होऊन ७८ वर्ष व महाराष्ट्र स्वतंत्र होऊन ६४ वर्ष उलटून गेले तरी सोलापूरात साहित्यिकांना लेखकाना वक्त्यांना एकत्रित येण्यास हक्काचे ठिकाण नाही. म्हणून सोलापूरात मध्यवर्ती ठिकाणी आम्हास मराठी भवन साठी जागा उपलब्ध करून ते बांधून द्यावे. अशा अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री व आमदार तसेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
शहरातील साहित्यिक रामप्रभू माने याच्या पुढाकाराने देण्यात आले या वेळेस शहरातील साहित्यिक कविवर्य कवयित्री उपस्थीत होते. सौ. संध्या धर्माधिकारी, सौ. रेणुका बुधाराम, शिवाजी शिंदे, नरेंद्र गुंडेली, सौ. वनिता गवळी, घोडके, डी. एन. जमादार, जमालोद्दिन शेख, दत्तात्रय इंगळे. शैलेष उकरंडे, जावेद शेख, सुरेश निकंबे, कु. प्रियंका जगझाप, सौ. अनिता विभुते, मयुरेश कुलकर्णी, भगवान चौगुले, अंबादास जाधव, सौ. विद्या साबळे यांच्यासह शहरातील अनेक साहित्यिक उपस्थित होते.