22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेची राज‘पुत्र’ अमित ठाकरेंसह ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मनसेची राज‘पुत्र’ अमित ठाकरेंसह ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार

मुंबई : विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) दुसरी यादी मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली असून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता होती, ती आता खरी ठरली असून अमित ठाकरेंना माहिम मतदारसंघातून उतरवण्यात आले आहे. यादीत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या ७ उमेदवारांची नावे आपल्या महाराष्ट्र दौ-यात जाहीर केली होती. त्यानंतर, ठाण्यातील कल्याणमध्ये आमदार राजू पाटील यांच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर ठाणे व कल्याण ग्रामीणमधील २ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर, राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मनसेच्या ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, राजपुत्र अमित ठाकरेंना मुंबईतील माहिम मतदारसंघातून मनसेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर, संदीप देशपांडे यांना वरळी मतदारसंघातून आणि बेलापूरमधून गजानन काळेंनी उमेदवारी देण्यात आली आहे.

सोमवारी राज ठाकरे यांनी पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली होती. राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष निरीक्षकांकडून आलेल्या अहवालावर चर्चा केली. कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? मनसे उमेदवार ती जागा जिंकू शकतात का? याचा आढावा घेतला होता. तसेच अमित ठाकरे यांनी माहीम मतदरसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकीत धरला होता. दरम्यान, यापूर्वीच राज ठाकरेंनी ९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR