पुणे/ प्रतिनिधी : येत्या दि २,३ आणि ४ फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून त्यामधील ‘कवी कट्टा ’ उपक्रमांसाठी नवोदित कवींकडून रचना मागवण्यात आल्या आहेत.
गेली काही वर्ष साहित्य संमेलनात कवी कट्टा उपक्रम घेण्यात येतो असे उपक्रमाचे मुख्य संयोजक राजन लाखे यांनी सांगितले.ते म्हणाले ,दरवर्षी या उपक्रमास वाढता प्रतिसाद मिळतं आहे .याबाबत नुकतीच अंमळनेर येथे बैठक झाली त्यामध्ये उपक्रमाबाबत निर्णयं घेण्यात आला.या उपक्रमासाठी राज्याच्या विविध भागातील कवींकडून कविता मागविण्यात आहेत आलेल्या रचनापैकी केवळ २०० रचनांची उपक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे .
पाठविण्यात येणारी रचना ही स्वरचित असावी तसेच रचना २० ओळींची असावी तसेच कवींनी एकच रचना पाठवायची आहे. रचनाच्या निवडीसाठी स्वतंत्र निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे .रचना पोस्टाने अथवा ई- मेल वर पाठवावी असे त्यांनी सांगितले .रचना युनिकोड फॉन्ट मध्ये असावी .येत्या २० डिसेंबरपर्यत रचना पाठविण्याची मुदत असणार आहे .
ई- मेल [email protected] अथवा पोस्टाने मराठी वाड्मय मंडळ नांदेडकर सभागृह न्युप्लाट अंमळनेर,जि जळगाव ४२५४०१