25.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूरवैशालीताई देशमुख यांनी महिला मतदारांची घेतली थेट भेट 

वैशालीताई देशमुख यांनी महिला मतदारांची घेतली थेट भेट 

लातूर : प्रतिनिधी
सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यानिमित्ताने विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दि. २३ ऑक्टोबर रोजी लातूर तालुक्यातील खाडगाव येथे थेट महिला मतदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. काँग्रेस महाविकास आघाडीला पुन्हा एकदा आशिर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
खाडगाव येथे बुधवारी संवाद मेळाव्याचे आयोजन केरण्यात आले होते. प्रारंभी श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी गावातून पदयात्रा काढून महिला मतदारांची थेट भेट घेतली. या पदयात्रेस महिला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आयोजित संवाद मेळाव्यात त्यांनी संवाद साधला. यावेळी काँग्रेसच्या नेत्या सुनिताताई अरळीकर, लातूर पंचायत समितीच्या माजी सभापती शितलताई फुटाणे, खाडगावचे सरपंच नेताजी देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज जाधव, अनंत बारबोले, अभिनंद जाधव, सविता देशमुख, कांताबाई मस्के यांची प्रमुख उपस्थिती  होती.
यावेळी बोलताना वैशालीताई देशमुख म्हणाल्या, थापा मारुन जनतेची दिशाभूल करणे हेच भाजपा महायुतीचे भांडवल आहे. जनतेच्या विकासाच्या योजनांचा दृष्टीकोन त्यांच्याकडे नाही. या उलट काँग्रेस महाविकास आघाडी जनसामान्याच्या सर्वांगीण विकासाचे ‘व्हीजन’ घेऊन आपल्यासमोर येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अमित देशमुख व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार धिरज देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.  याप्रसंगी भास्करराव जाधव, दौलतराव देशमुख, स्वाती देशमुख, सविता देशमुख, आशाताई मलवाड, कांताबाई मगर आदीसह कॉग्रेस पक्षाचे पधादिकारी व गावकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR