25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeराष्ट्रीयवाह रे वाह...भिका-यांचे मासिक उत्पन्न एका लाखावर!

वाह रे वाह…भिका-यांचे मासिक उत्पन्न एका लाखावर!

स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही वापर वाढला

लखनौ : लखनौमध्ये अनेक भिका-यांकडे स्मार्टफोन आणि पॅनकार्ड सापडले असून भिका-यांसंबंधित अभियान आणि सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक भिका-यांचे सरासरी मासिक उत्पन्न ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे. सर्वेक्षणादरम्यान लखनौमध्ये ५३१२ भिकारी आढळून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये भिका-यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यासंदर्भात समाज कल्याण विभाग आणि डीयूडीए (जिल्हा नागरी विकास संस्था) यांनी एक सर्वेक्षण केलं. ज्यामध्ये ५३१२ भिकारी आढळले ज्यांची कमाई कष्टकरी लोकांपेक्षा जास्त आहे. लहान मुलांना कडेवर घेऊन भीक मागणा-या महिलांची रोजची कमाई प्रत्येकी ३,००० रुपयांपर्यंत आहे. वृद्ध आणि लहान मुले ९०० रुपयांपासून ते २ हजार रुपये कमावत आहेत. सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले की, ते अनेक दिवसांपासून परिसराचं सर्वेक्षण करत आहेत.

काही लोक मुद्दाम भीक मागत आहेत. ९० टक्के भिकारी आहेत, जे हरदोई, बाराबंकी, सीतापूर, उन्नाव, रायबरेली इत्यादी जिल्ह्यांमधून आले आहेत. या भिका-यांचे उत्पन्न समजल्यावर अधिका-यांनाही धक्का बसला. त्यांनी सांगितले की, बाराबंकीच्या लखपेडाबाग येथे राहणारा भिकारी अमन याच्याकडे स्मार्टफोनपासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही आहे. त्याच पॅनकार्डही आहे.

लखनौवासी दररोज करतात ६३ लाखांचे दान
सर्वेक्षणानुसार, लखनौचे लोक दररोज सरासरी ६३ लाख रुपये भिका-यांना देतात. लखनौ महानगरपालिका, समाजकल्याण विभाग आणि डीयूडीए यांच्या सर्वेक्षणात राजधानी लखनौमध्ये एकूण ५३१२ भिकारी आढळले आहेत. या भिका-यांच्या उत्पन्नाबाबत सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, ते दररोज सरासरी ३,००० रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. ही कमाई करण्यात स्त्रिया पुढे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR