20.7 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे सेनेच्या दुस-या यादीत ५ लाडक्या बहिणींचा बोलबाला

ठाकरे सेनेच्या दुस-या यादीत ५ लाडक्या बहिणींचा बोलबाला

मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाली. यात १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या यादीत महिलांना अधिकाधिक संधी ठाकरे गटाने दिल्याचे दिसत आहे. १५ जणांच्या उमेदवार यादीत ५ महिलांना संधी दिल्याचे दिसत आहे. मुंबईतील सातत्याने चर्चेत असणा-या शिवडीच्या जागेवरून शिवसेनेच्या ठाकरे गटातच रस्सीखेच सुरु होती. या जागेवरून सुधीर साळवी आणि अजय चौधरी हे इच्छुक होते. आता जाहीर झालेल्या दुस-या उमेदवार यादीत शिवडीच्या जागेवरून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १५ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन दिवसांआधी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अनिल गोटे यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. धुळे शहरमधून त्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीसोबत रस्सीखेच सुरु असलेल्या श्रीगोंद्याच्या जागेवर अनुराधा नागावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पाच लाडक्या बहिणी
ठाकरे गटाच्या दुस-या यादीत पाच महिलांना संधी देण्यात आली आहे. जळगाव शहरमधून जयश्री महाजन, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जयश्री शेळके, हिंगोलीतून रूपाली पाटील, वडाळ्यामधून श्रद्धा जाधव, श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR