25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीबेकायदेशीररित्या टर्मिन इंजेक्शन विकणा-यास पकडले

बेकायदेशीररित्या टर्मिन इंजेक्शन विकणा-यास पकडले

परभणी : शहरातील खंडोबा बाजार परीसरात अंमली पदार्थ म्हणून टर्मिन इंजेक्शनची बेकायदेशीरित्या विक्री करणा-या आरोपीस दि.२६ ऑक्टोबर रोजी विशेष पथक क्रमांक ०२च्या अधिकारी व अमलदार यांनी सापळा रचून पकडले. आरोपी शेख जुनेद रिझवी (वय २४) रा. गुलशन बाग परभणी याचेकडून टर्माईन इंजेक्शनसह ४३५२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान अंमली पदार्थ म्हणून विक्री करण्यात येत असलेल्या इंजेक्शनसह आरोपीस पकडण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशान्वये वरील पथकास गोपनीय माहिती मिळाली होती. आरोपी शेख जुनेद रिजवी हा खंडोबा बाजार परिसरात अंमली पदार्थ टर्मिन इंजेक्शनची विनापरवाना बेकायदेशीररित्या लोकांकडून पैसे घेऊन विक्री करत आहे. या माहितीवरून आरोपीस सापळा रचून शित्तफिने ताब्यात घेतले. आरोपीकडून टर्मिन इंजेक्शन असा एकूण ४३५२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात पोलिस स्टेशन नानापेठ येथे जीवनाशक वस्तू अधिनिय अधिनियम १९५५ सहकलम १८ (अ), १८ (उ), २७(ऊ) औषधी व सौंदर्य प्रसाधनाने कायदा १९४० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनी सय्यद करत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे, पोलीस आमदार चव्हाण, मोहम्मद अबुजर, इम्रान पठाण सर्व नेमणूक विशेष पथक क्रमांक २ यांनी मिळून केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR