परभणी : डॉ. जाकीर हुसेन सेवाभावी संस्था, साईनाथ सेवाभावी संस्था, समाजहित अभियान, रुग्णहक संरक्षण समिती, संस्कार सेवाभावी संस्थाच्या वतीने दि.२६ ऑक्टोबर रोजी नूतन महिला महाविद्यालय परभणी येथे सामाजिक कार्यकर्ते सत्तार इनामदार यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ फेटा देऊन उत्कृष्ट प्रवक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देतान इनामदार म्हणाले की, कर्तबगारी, संस्कार, सत्यता हा दृष्टिकोन ठेवून कार्य केल्यास समाज नक्कीच दखल घेऊन काम करणा-या व्यक्तीला त्याच्या कार्याची पावती देऊन त्याचा सन्मान नक्कीच होत असतो असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र भूषण आर.डी मगर यांनी आपल्या भाषणातून इनामदार यांच्या कार्याचे कौतुक केले. वडीलधा-यांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. अॅड. अशोक सोनी यांनी म्हणाले की, खरे पाहिले तर आम्ही सत्तार इनामदार यांचा विशेष गौरव करण्यासाठी फार उशीर केला आहे. हा सन्मान त्यांना १० वर्षांपूर्वीच मिळायला पाहिजे होता असे मत व्यक्त केले.
यावेळी समाजसेवक जे.डी. शाह गेवराई, खदीर लाला हाश्मी, हाजी शरीफ शेख, सुरज कदम, मा. नगरसेवक मोइन मौल्ली, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष अॅड. निलेश पुरी, आयोजक शेख शफीख चारठाणकर, प्रमोद आंबोरे, सरफराज शेख, तब्बू पटेल उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अरुण पडघन, आभार प्रदर्शन दिलीप बनकर यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.