23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीनांदेड-पनवेल आणि विजयवाडा-नांदेड विशेष गाडी धावणार

नांदेड-पनवेल आणि विजयवाडा-नांदेड विशेष गाडी धावणार

परभणी : दिवाळी आणि छट निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी लातूर-पुणे मार्गे आणि नांदेड-विजयवाडा विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. दरम्यान नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी मार्गे मनमाड, कल्याण रद्द करण्यात आली आहे.

नांदेड – पनवेल – नांदेड विशेष गाडी मार्गे मनमाड – कल्याण ही विशेष गाडी दिवाळी-छट निमित चालविण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतू प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे ही गाडी तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. नांदेड-पनवेल विशेष गाडीची एक फेरी गाडी क्रमांक ०७६८५ हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दि.२ नोव्हेंबर रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, पुणे, लोणावळा, कर्जतमार्गे पनवेल येथे दुस-या दिवशी सकाळी ११.१५ वाजता पोहोचेल.

पनवेल – नांदेड विशेष गाडीची एक फेरी गाडी क्रमांक ०७६८६ पनवेल ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दि.३ नोव्हेंबर रोजी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी १२.३५ वाजता सुटेल आणि पुणे, परळी, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुस-या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोहोचेल.

विजयवाडा-नांदेड विशेष गाडीची एक फेरी गाडी क्रमांक ०७०२० विजयवाडा ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडी दि.२८ ऑक्टोबर रोजी विजयवाडा येथून सायंकाळी ६.४० वाजता सुटेल आणि गुंटूर, सत्तेनापल्ली, सिकंदराबाद, निझामाबाद मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुस-या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन नांदेड रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR