उदगीर : प्रतिनिधी
हजारोंचा जनसमुदाय सहभागी असलेल्या रॅलीद्वारे, शहरातील नागरिकांना अभिवादन करीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरेमंत्री ना. संजय बनसोडे यांनी महायुतीकडून प्रचंड शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उदगीर शहरात पार पडलेली महारॅलीने ना. संजय बनसोडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी होती, असा विश्वास यावेळी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोलतान व्यक्त केला.
उदगीर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे यांनी सोमवारी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आ. गोंिवंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, जिल्हा परिषदेचे माजी
अध्यक्ष राहूल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख, मकरंद सावे, ना. संजय बनसोडे यांच्या पत्नी सौ. शिल्पा बनसोडे, प्रशांत पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, वीरशैव ंिलंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, शहराध्यक्ष मनोज पुदाले, सुधीर भोसले, शिवसेनेचे नेते अॅड. गुलाब पटवारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानी,अमोल निडवदे, डॉ. कल्पना किणीकर, महानंदा सोनटक्के, दीपाली औटे, अनिता हैबतपुरे, प्रीती पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व रिपाइंसह घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे हे महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने सकाळ पासूनच नागरिकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात गर्दी करण्यासाठी सुरुवात केली होती. रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी ना. बनसोडे यांनी उदागिर बाबांच्या किल्यात जाऊन दर्शन घेतले. त्यांनतर हजरत सय्यद ख्वाजा बादशाह रहेमतुल्ला दर्गा येथे चादर चढवून प्रार्थना केली. यानंतर श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठ, श्री शंकरंिलंग महाराज मठ संस्थान, विश्वशांती बुद्ध विहार, आदी ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. महारॅली मुख्य रस्त्यावरुन सकाळी १० वाजता निघाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शाहु महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास ना. बनसोडे यांनी अभिवादन केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीची सुरुवात झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत नागरिकांची गर्दी केली होती. तब्बल पाच ते सहा तास शहरात रेकॉर्ड ब्रेक नागरिकांची गर्दी होती. यावेळी विविध वेशभूषेतील महिला व पारंपारिक वाद्याने रॅलीची शोभा वाढवली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ना. संजय बनसोडे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केले.