27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीवसुबारस निमित्त १०८ दाम्पत्याव्दारे गोपूजन

वसुबारस निमित्त १०८ दाम्पत्याव्दारे गोपूजन

परभणी : वसुबारस निमित्त दि. २८ ऑक्टोबर रोजी राणीसावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेत १०८ दाम्पत्याद्वारा गोमाता पूजन व गो आरती कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास रामायणाचार्य हरिभक्त परायण रोहिदास मस्के महाराज, श्री योगगुरू डीकले गुरुजी, युवा कीर्तनकार नामदेव महाराज भिसे, हरिभक्त परायण पिंटू महाराज, शिवभक्त परायण महादेव स्वामी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेचे संचालक शिवसांब कोरे, ओंकार कोरे, विहीप सेंद्रिय शेती महाराष्ट्र क्षेत्र प्रशिक्षण प्रमुख शिवप्रसाद कोरे व गावातील गोभक्त व महिला भगिनी उपस्थीत होत्या.

प्रास्ताविक शिवप्रसाद कोरे यांनी केले. ंिहदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी हा गोमातेच्या पूजनाने वसुबारसपासून सुरुवात होतो. भगवान श्रीकृष्णाची सर्वात आवडती गोमातेचे पूजन करून सुरुवात होते. गाय वाचवायचे असेल तर गाय आधारित विषमुक्त शेती करा त्यासाठी आपल्याला गोशाळा पूर्णपणे सहकार्य करेल. गोकृपा अमृत शेतक-यांसाठी वरदान आहे.

गोशाळा सर्वांच्या भविष्यासाठी विषमुक्त शेती करून येणा-या पिढीचे आरोग्य वाचवण्याचे कार्य करत आहे. हभप. रोहिदास मस्के महाराजांनी गोमाता प्रत्येक ंिहदूंच्या घरी असायला हवी व गोमातेला दान केल्याने सर्व देवता प्रसन्न होतात. गोमातेला दान करुन चारा खाऊ घातल्याने आपल्या व्यवसायाची भरभराट होते असे सांगितले. प्रत्येक हिंदूंनी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा गोमातेसाठी, धर्मासाठी खर्च करावा असे आवाहन केले.

ह.भ.प. योग गुरु डिकले महाराज यांनी प्रत्येक हिंदु देवता गोमाते सोबत आहेत हे दाखवून दिले. जिथे जिथे भगवान श्रीकृष्ण दिसतील तिथे त्यांच्यासोबत गाय दिसते तसेच श्री दत्त यांच्या पाठीमागे सुद्धा गाय आहे. देवाधिदेव महादेव यांचे वाहन सुद्धा व गोमातेचा पुत्र नंदी देव आहे हे त्यांनी सांगितले. गाय वाचवायचे असेल तर गोमाता आधारित शेती करा आणि शेतक-यांना आपली भरभराटी करून आपल्या भारतात हिंदू संस्कृतीला व आपल्या शेतीला वाचवा असे आवाहन केले.

तसेच गोभक्त रोहित बंडे यांनी गोमातेच्या शेना मध्ये माता लक्ष्मीचा वास आहे असे सांगितले. शिवसांब कोरे यांनी गाय हमारी माता है जनम जनम का नाता है असे सांगून गोमातेला सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. पुढच्या वर्षी १२५ दाम्पत्यांच्या हस्ते गो पूजन कार्यक्रम करू असे जाहीर केले. या कार्यक्रमात दिनेश भाई शर्मा यांच्या परिवाराच्या वतीने गोमातेला गुळ प्रसाद खाऊ घालून सुरुवात झाली. गोमाते बद्दल मार्गदर्शन झाल्यावर गाईची पूजा आरती करून गोमातेला प्रसाद देऊन गोपुजन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी संतोष गाडे यांनी गोमातेचे महत्त्व सांगितले. ओंकार कोरे यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR