21.9 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeलातूर‘डमी’मुळे अधिकृत उमेदवार अस्वस्थ

‘डमी’मुळे अधिकृत उमेदवार अस्वस्थ

लातूर : निवडणूक डेस्क
माढा मतदारसंघात अभिजीत पाटील नावाचे चार, रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. करमाळ्यात तीन संजय शिंदे रिंगणात उतरले आहेत. नावात साधर्म्य असलेल्या या उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार यात काही शंका नाही.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या ‘तुतारी’शी साधर्म्य असणा-या ‘पिपाणी’ या चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक मतदारसंघात मोठा फटका बसला होता. आता नावात साधर्म्य असणारे उमेदवार वाढल्याने मतदारांचा संभ्रम देखील वाढणार आहे. माढ्यात अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अभिजीत धनंजय पाटील यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय अभिजीत अण्णासाहेब पाटील, अभिजीत तुळशीराम पाटील असे चारजण एकाच नावाचे उमेदवार माढ्यात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवीत असताना येथूनच रणजीत मारुती शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली.

करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय मामा विठ्ठलराव शिंदे हे अपक्ष उमेदवार असून येथूनच संजय लिंबराज शिंदे आणि संजय वामन शिंदे अशा दोघांनी उमेदवारी दाखल केली आहे. नांदगाव मतदार संघात देखील दोन सुहास कांदे निवडणूक रिंगणात उभे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR