21.1 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरमध्ये २ बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार

जम्मू-काश्मीरमध्ये २ बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मगम भागात २ बिगर-काश्मिरी मजुरांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील सहानपूर येथील उस्मान मलिक (२०) आणि सुफिया (२५) या घटनेत जखमी झाले आहेत. उस्मानच्या उजव्या हाताला, तर सुफियानच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. दोघेही जलशक्ती विभागात रोजंदारीवर काम करत होते. सुदैवाने दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गैर-काश्मिरींवर गोळीबार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा गैर-काश्मिरी नागरिकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. गेल्या आठवड्यात बटागुंड त्रालमध्ये गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये संघटित दहशतवाद कमी झाल्यानंतर टार्गेट किलिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या वर्षीही दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या भागात निवडकपणे बिगर काश्मिरींची हत्या केली होती. अनंतनाग, पुलवामा आणि पुंछमध्ये टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR