18.1 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भात डॅमेज कंट्रोल करण्यात भाजप ‘ढकल पास’

विदर्भात डॅमेज कंट्रोल करण्यात भाजप ‘ढकल पास’

फडणवीस, बावनकुळेंची प्रतिष्ठा लागली पणाला!

नागपूर : विशेष प्रतिनिधी
पूर्व विदर्भात ३२, तर पश्चिम विदर्भात विधानसभेच्या ३० जागा आहेत. यामध्ये अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत अनेक मतदारसंघांमधील बंडाळी मोडून काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले असले, तरी शंभर टक्के डॅमेज कंट्रोल झालेले नाही.

नागपूर मध्य या मतदारसंघात हलबा समाजाच्या स्वतंत्र उमेदवारामुळे हक्काच्या मतदारसंघात आव्हानात्मक स्थिती आहे. नागपूर पश्चिम, दक्षिण व उत्तर या मतदारसंघांतही भाजपसमोर आव्हान आहे. सावनेरमध्ये प्रतिष्ठेचा सामना असून राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर येथे भाजपसमोर चुरस आहे.

अमरावतीत बंडखोरांमुळे डोकेदुखी
अमरावतीच्या तिवसा, अचलपूर, मेळघाट, धामणगाव रेल्वे आणि मोर्शी या पाच मतदारसंघांत भाजप लढत असून मोर्शीत अजित पवार गटाने मैत्रीपूर्ण लढतीची स्थिती निर्माण केली. अमरावती, बडनेरा मतदारसंघांत भाजपला बंडखोरांना थांबविता आलेले नाही.

भाजपला यश देणारा यवतमाळ
यवतमाळमध्ये यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी, उमरखेड येथे चुरशीचा सामना आहे. वर्धेत चारही मतदारसंघांत भाजप तगडी फाइट देत आहे. अकोला भाजपला शत-प्रतिशत यश देणारा जिल्हा आहे, हे समीकरण सांभाळण्यासाठी यावेळी बाळापुरात शिंदेसेनेला उमेदवार पुरविला.

भाजपची नवी समीकरणे…
अकोला पश्चिममध्येही बंडखोरी झाली आणि आघाडीने मात्र मतविभाजन टाळून आव्हान निर्माण केले, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, अकोट येथे वंचितचे मतविभाजन निर्णायक ठरते. वाशिम व कारंजात नव्या समीकरणांची मांडणी केली आहे; पण रिसोडमध्ये माजी आमदार अनंतराव देशमुखांना थांबविणे भाजपला शक्य झाले नाही.

बुलढाण्यात भाजपसमोर आव्हान
बुलढाण्यातील सातपैकी चार मतदारसंघांत भाजपने जुनाच सारीपाट नव्याने मांडला आहे. मलकापुरात चैनसुख संचेती यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. जळगाव जामोद मध्ये डॉ. संजय कुटे हे पाचव्यांदा रिंगणात आहेत. खामगावात आकाश फुंडकर व चिखलीत श्वेता महाले यांना काँग्रेसच्या माजी आमदारांचे आव्हान आहे.

भाजपची कोणाविरोधात लढाई?

भाजपचे उमेदवार : ४७
भाजप विरुद्ध काँग्रेस : ३५
भाजप विरुद्ध रा. शरद पवार : ०८
भाजप विरुद्ध उद्धवसेना : ४

विदर्भातील राजकीय स्थिती
२००९ च्या निवडणुकीत काँग्रेस विदर्भात क्रमांक एकचा पक्ष होता. २०१४ मध्ये भाजपने तब्बल ४४ जागा जिंकत मुसंडी मारली व १२२ जागांसह राज्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष बनला. २०१९ मध्ये भाजपने विदर्भात १५ जागा गमावल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR